Paper Details
अनुसूचित जाती व जमाती विषयक राज्यघटनेतील तरतुदी: सामाजिक, आर्थिक व राजकीय परिणामांचा अभ्यास
Authors
सह. प्रा. एम. एस. देशमुख
Abstract
“मनातून जात नाही ती जात” अशी सोप्या भाषेत व्याख्या बाबा महाराज सातारकर यांनी केली. भारतीय वर्णव्यवस्थेनुसार, चार वर्ण आहेत ब्राम्हण हे ज्ञानदानाचे कार्य करणारे, वैश्य व्यवसाय करणारे, क्षत्रिय रक्षण करणारे व शेवटी शुद्र गुलामगिरी करणारे अशा पध्दतीने मानवतेला कंलक लावणारी वर्णव्यवस्था अस्तित्वात होती आणि आजही थोड्या फार प्रमाणात अस्तित्वात आहे.
भारतीय समाज हा विविध जाती, धर्म, भाषा व संस्कृतीने, विविधतेने नटलेला देश असला तरी, यामध्ये काही वर्ग शतकानु शतके सामाजिक ,आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिले. विशेषत:अनुसुचित आती व जमाती या वर्गांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाची भारतीय संविधानात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत, या तरतुदींचा प्रमुख उद्देश म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, समान संधी देणे आणि न्याय प्रशोषणमुक्त समाजाची उभारणी करणे होय.
भारतीय राज्यघटनेतील अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी असलेल्या तरतुदींचा त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवनावर सकारात्मक प्रभाव पडतो. या तरतुदीमुळे त्यांना शिक्षण, नोकरी,राजकीय प्रतिनिधित्व आणि इतर सामाजिक योजनांमध्ये आरक्षण आणि विशेष अधिकार मिळतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधारणा होत आहेत.
Keywords
-
Citation
अनुसूचित जाती व जमाती विषयक राज्यघटनेतील तरतुदी: सामाजिक, आर्थिक व राजकीय परिणामांचा अभ्यास. सह. प्रा. एम. एस. देशमुख. 2025. IJIRCT, Volume 11, Issue 2. Pages 1-4. https://www.ijirct.org/viewPaper.php?paperId=2504063